महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे नागपूर येथे अधिवेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे नागपूर येथे अधिवेशन
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे नागपूर येथे अधिवेशन

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे नागपूर येथे अधिवेशन

sakal_logo
By

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे नागपूर येथे अधिवेशन
पुणे, ता. ३ ः महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे शनिवार (ता. ८) व रविवारी (ता. ९) नागपूर येथे अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्‌घाटन भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय महामंत्री रवींद्र हिंमते यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रीय संघटन मंत्री सी.बी. राजेश, स्वागताध्यक्ष दत्ता धामणकर, विदर्भ प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार, प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे. अधिकाधिक कामगारांनी या अधिवेशनाला उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे.

भगवानगडावर दसऱ्याला संकल्प मेळावा
पुणे, ता. ३ ः भगवान गड दसरा मेळावा कृती समितीतर्फे बुधवारी (ता. ५) दसऱ्याला भगवान गड येथे संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भगवान गडावरील दसऱ्याला होणाऱ्या मेळाव्यासाठी राज्यभरातून लोक एकत्र येत असत आणि विचारांचे सोने लुटत असत. ही परंपरा काही कारणांमुळे खंडित झाली आहे. त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व ऊर्जेचा स्रोत असलेल्या भगवानगडाच्या पायथ्याला जाऊन विचारांची लयलूट करण्यासाठी या संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी घोषणा केल्याप्रमाणे गडाच्या माथ्यावर कोणत्याही प्रकारचे राजकीय भाषण होणार नाही. त्यामुळे हा मेळावा कोणत्याही राजकीय पक्षाशी अथवा नेत्याशी संलग्न नाही. दुपारी १२ वाजता हा मेळावा होणार असून भगवान भक्तांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे’, असे आवाहन समितीच्या सदस्यांनी केले आहे.