नवदुर्गा पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवदुर्गा पुरस्कार प्रदान
नवदुर्गा पुरस्कार प्रदान

नवदुर्गा पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : नवरात्रीनिमित्त विविध क्षेत्रांतील १७ महिलांना ‘नवदुर्गा पुरस्काराने’ नुकतेच गौरविण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आयोजित या कार्यक्रमास पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, कसबा संघ अध्यक्ष गणेश नलावडे, शहर महिलाध्यक्षा मृणालिनी वाणी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात वैशाली थोपटे, ॲड. सुजाता मुजुमले, अंजली सोलापुरे, हेमलता बलकवडे, मिलन पवार, ॲड. नयन गायकवाड, सुप्रिया देसाई, वैशाली भंडारे, हिरा खणेकर, गायत्री कडवे, उषा मोरे, संगीता निंबाळकर, संपदा परांजपे, चैत्राली भरेकर, अंजली मोरे, संगीता शिंदे, वर्षा खत्री यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन दीपक पोकळे व मंजिरी कोठुळे यांनी केले होते.