राज्यात बँकांना आठ दिवस सुट्ट्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात बँकांना आठ दिवस सुट्ट्या
राज्यात बँकांना आठ दिवस सुट्ट्या

राज्यात बँकांना आठ दिवस सुट्ट्या

sakal_logo
By

नवी दिल्ली, ता. ३ : दसऱ्यानंतर दिवाळी, छट पूजा अशी सणांची रेलचेल असल्याने या महिन्यात देशभरातील बँकांना तब्बल २१ दिवस सुटी असल्याची चर्चा आहे. मात्र हा आकडा देशभरातील बँकांच्या सुट्यांचा एकत्रित आहे. राज्यातील बँकांना या महिन्यात एकूण ११ दिवस सुट्या आहेत.
राज्यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह रविवारची साप्ताहिक सुटी आणि दसरा व दिवाळीच्या दोन दिवसांच्या सुट्यांचा समावेश आहे. यापैकी दोन शनिवार आणि प्रत्येक रविवार या सुट्या दर महिन्यात असतात. त्यानुसार या महिन्यात त्या सहा सुट्या आहेत. तर एक तारखेला देशभरातील बँका सहामाही आर्थिक कामकाजानिमित्त ग्राहकांसाठी बंद होत्या. दसऱ्यानंतर २४ व २६ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेच्या सुटीसह एकूण आठ दिवस सुट्टी आहे.

महाराष्ट्रातील सुट्यांची यादी
८ ऑक्टोबर- दुसरा शनिवार
९ ऑक्टोबर- रविवार
१६ ऑक्टोबर- रविवार
२२ ऑक्टोबर- चौथा शनिवार
२३ ऑक्टोबर- रविवार
२४ ऑक्टोबर- लक्ष्मी पूजन/नरक चतुर्दशी
२६ ऑक्टोबर- दिवाळी पाडवा/भाऊबीज
३० ऑक्टोबर- रविवार

रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार, देशातील बँकांना त्या-त्या राज्यातील स्थानिक सणांच्या सुट्या दिल्या जातात. त्यानुसार राज्यात दसरा आणि दिवाळीचे दोन दिवस अशा तीनच सुट्या अतिरिक्त आहेत. सुट्यांच्या काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एटीएममध्ये रोख रकमेचा भरणा केलेला असतो, तसेच ई-गॅलरीच्या माध्यमातून विविध सेवा दिल्या जातात. बँकांच्या ऑनलाइन सुविधा असल्याने अखंड उपलब्ध आहेत.
- दीपक पाटील,
अध्यक्ष, कर्मचारी संघटना बँक ऑफ इंडिया व पुणे जिल्हा बँक कर्मचारी संघटना