यूको बॅंकेच्या पाच नव्या शाखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यूको बॅंकेच्या पाच नव्या शाखा
यूको बॅंकेच्या पाच नव्या शाखा

यूको बॅंकेच्या पाच नव्या शाखा

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : यूको बॅंकेच्या वतीने पुणे जिल्ह्यात नव्या पाच शाखांची सुरुवात करण्यात येत असून, सोमवारी (ता. ३) चाकण येथील शाखेचे उद्‍घाटन करण्यात आले. बॅंकेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सोमाशंकर प्रसाद यांच्या हस्ते याचे उद्‍घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील ही २५ वी शाखा आहे. या वेळी विभागीय प्रबंधक के. बालसुब्रमणियम, उपविभागीय प्रबंधक रमेशकुमार सिंह उपस्थित होते.

चाकण शाखेबरोबरच विमाननगर, उंड्री, रावेत आणि बालेवाडी येथेही नव्या शाखा उघडण्यात येत आहेत. या वेळी प्रसाद म्हणाले, ‘‘कोरोनानंतर अर्थव्यवस्था आधीपेक्षा जास्त गतीने वाढत असून, गृह, वाहन आदी कर्जांची मागणीही वाढत आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या उद्दिष्टांप्रमाणे आमच्या बॅंकेनेही कर्जवाटपात १५ ते १६ टक्के वाढ करण्याचे ठरविले आहे.’’ परदेशातील व्यापारासाठी रुपयांतील व्यवहारांना प्राधान्य दिल्यामुळे परदेशी चलनाची बचत तर होईलच, त्याचबरोबर रुपयाला आंतरराष्ट्रीय चलन म्हणून प्रस्थापित करण्यास मदत होईल, असा विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला.