तरुण साधकांनी वाहिली सांगीतिक ‘गुरुवंदना’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुण साधकांनी वाहिली सांगीतिक ‘गुरुवंदना’
तरुण साधकांनी वाहिली सांगीतिक ‘गुरुवंदना’

तरुण साधकांनी वाहिली सांगीतिक ‘गुरुवंदना’

sakal_logo
By

तरुण साधकांनी वाहिली सांगीतिक ‘गुरुवंदना’
पुणे : कलाश्री संगीत मंडळ आयोजित ‘गुरुवंदना’ या सांगीतिक कार्यक्रमात तरुण साधकांनी आपले गुरू पं. श्रीकांत देशपांडे व डॉ. सुधाकर मराठे यांना सांगीतिक गुरुवंदना अर्पण केली. कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष पं. सुधाकर चव्हाण यांच्या ३६ शिष्यांनी गायन व वाद्यवादन कला सादर केली. या वेळी अनुराग जोशी यांनी अतिथी कलाकार म्हणून आपले बासरीवादन सादर केले, तर पं. धनंजय मराठे यांच्या गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. या वेळी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई या संस्थेचे सचिव बाळासाहेब सूर्यवंशी, डॉ. वसंतराव खांडगे आणि साहित्यिक डॉ. दीपक चैतन्य यांची या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. प्राची पांचाळ आणि अभयसिंह वाघचौरे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

‘संवादसेतू’च्या विनोदी कथास्पर्धेचा निकाल जाहीर
पुणे : ‘संवादसेतू’ या दिवाळी अंकातर्फे कै. बा. ल. शुक्ल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित विनोदी कथास्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. डॉ. आरती रानडे यांच्या ‘मै, मेरी पत्नी और वो’, मकरंद जोशी यांच्या ‘लॉकडाउन मोरू’ आणि शिरीष नाडकर्णी यांच्या ‘आभासी राज्याचे किल्लेदार’ या कथांना लक्षवेधी कथांचे पारितोषिक जाहीर झाले. तर, विकास कुलकर्णी यांच्या ‘भूतभागा’ आणि प्रेमा खांडवे यांच्या ‘आळीमिळी गुपचिळी’ या कथांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे. या स्पर्धेत सुमारे ६५ कथालेखक सहभागी झाले होते. ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेतील तीन लक्षवेधी कथा यंदाच्या ‘संवादसेतू’ दिवाळी अंकात वाचायला मिळतील.

कला म्हणजे आनंद देणे, प्रसन्न करणे : डॉ. परांजपे
पुणे : ‘‘आपल्याकडे चौसष्ट कला आहेत. कला या शब्दाचे वीस अर्थ आहेत. कोणत्याही क्षेत्रातील कलाकाराच्या प्रतिभेला प्रतिमेत प्रतिबिंबित करून ती सृजनशक्ती अविष्कृत करतो, त्याला कला असे म्हणावे. कला म्हणजे आनंद देणे, प्रसन्न करणे’, असे प्रतिपादन डॉ. सुचेता परांजपे यांनी नुकतेच केले. ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाच्या कला व संस्कृती विशेष उद्दिष्ट गटातर्फे आयोजित ‘नृत्य समिधा’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी ‘शेडस् ऑफ वूमनहूड’ या माहितीपट-मालिकेचे यू-ट्यूबवर प्रकाशन झाले. माहितीपट मालिकेचा रसास्वाद डॉ. स्वाती दैठणकर यांनी सादर केला. सुवर्णा गोखले यांनी ग्रामीण भागातील स्त्री सशक्तीकरणाबद्दल विचार मांडले. या प्रसंगी ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, रामभाऊ डिंबळे, सुभाष देशपांडे, डॉ. विवेक कुलकर्णी, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. अनघा लवळेकर, डॉ. समीर दुबळे आदी उपस्थित होते.