मासिक पाळीबाबत जनजागृतीसाठी उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासिक पाळीबाबत जनजागृतीसाठी उपक्रम
मासिक पाळीबाबत जनजागृतीसाठी उपक्रम

मासिक पाळीबाबत जनजागृतीसाठी उपक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : मासिक पाळीच्या काळातील आरोग्य आणि या काळात वापरायच्या शाश्वत उत्पादनांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी पुण्यातील आठ महिलांनी अभिनव उपक्रम राबवला. नैसर्गिक पद्धतीने विघटित होऊ शकणाऱ्या ४,५६० सॅनिटरी पॅड्सची मोझॅक इमेज (कोलाजचा एक प्रकार) तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला.
हमजोली फाउंडेशनच्या आठ महिला स्वयंसेवकांनी सुमारे ६१.३ चौरस मीटर आकाराचे हे मोझॅक डिझाइन एक तास १५ मिनिटांत तयार केले. यात मेनस्ट्रुअल कप, टॅम्पॉन, पुनर्रवापर करता येणारे कापडी पॅड आणि सॅनिटरी पॅडचा वापर केला. या उपक्रमाबाबत हमजोली फाउंडेशनच्या संस्थापक आणि संचालिका डॉ. सानिया सिद्दीकी म्हणाल्या, ‘‘मासिक पाळीबाबत आजही आपल्या घरात खुलेपणाने संवाद होत नाही. मुली आणि स्त्रिया त्याबद्दल उघडपणे बोलण्यास तयार होत नाही. यामुळे महिलांच्या जीवनातील या नियमित आणि महत्त्वाच्या विषयाबाबत पुरेशी माहिती व जागरूकता निर्माण होत नाही. हे बदलण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. मासिक पाळीच्या काळात वापरायच्या पर्यावरणपूरक व शाश्वत उत्पादनांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि मासिक पाळीबाबत मोकळेपणाने संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा यामागील उद्देश होता.’’ या कार्यक्रमात वापरलेले सर्व सॅनिटरी पॅड आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मोफत वाटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.