ऑक्टोबर ‘हीट’ जाणवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑक्टोबर ‘हीट’ जाणवणार
ऑक्टोबर ‘हीट’ जाणवणार

ऑक्टोबर ‘हीट’ जाणवणार

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः शहरात उन्हाचा चटका जाणवू लागला असून, निरभ्र आकाशामुळे ऑक्टोबर ‘हीट’ वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी बहुतांश भागात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पुणेकरांनी निदान आठवडाभर तरी घराबाहेर पडताना रेनकोट बरोबरच उन्हाच्या चटक्यापासून वाचण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी.

संपूर्ण वायव्य भारतातून मॉन्सून परतला असतानाच, पुण्यासह राज्यातही अपवाद वगळता पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. मंगळवारी (ता.४) आकाश अंशतः ढगाळ तर दुपारनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आकाश निरभ्र असल्यास कमाल तापमान तिशीच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. राज्यातही अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला असून, विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३४ अंशांपार गेले आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान तिशीपार आहे. पुढील काळात ऑक्टोबर हीटचा चटका जाणवण्याची शक्यता आहे. मंगळवारी (ता. ४) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

कमी दाबाचे क्षेत्र ः
पश्‍चिम-मध्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली बुधवार (ता. ५) पर्यंत आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.