विद्येच्या प्रांगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्येच्या प्रांगणात
विद्येच्या प्रांगणात

विद्येच्या प्रांगणात

sakal_logo
By

बाबूराव फुले विद्यालयात स्पर्धा
पुणे, ता. ४ : नंदादीप एज्युकेशन सोसायटीचे समाजभूषण बाबूराव फुले माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘आंतरशालेय शिक्षक सांघिक स्पर्धा’ घेण्यात आली. याशिवाय प्रदर्शनही भरविण्यात आले होते. प्रशालेच्या प्राचार्या सुहासिनी कोंडेकर यांनी या वेळी मार्गदर्शन केले. प्रदर्शन प्रमुख संजीव तायडे, आसाराम आव्हाड, उमा घाडगे, ज्ञानदेव वायाळ, संजय जगताप यांनी प्राचीन वस्तू आणि स्थापत्य यांचे सुंदर व दुर्मिळ भित्तिपत्रके बनवून प्रशालेत प्रदर्शन आयोजित केले होते. प्रदर्शनास इतिहास अभ्यासक डॉ. गणेश चव्हाण, डॉ. सारिका बहिरट, विजय शिंदे तसेच, सरिता विद्यालयाचे मुख्याध्यापक सुजित जगताप यांनी भेट दिली.


सहस्रबुद्धे विद्यामंदिरात स्वच्छता मोहीम
पुणे, ता. ४ : कोथरूड येथील राजा शिवराय प्रतिष्ठानच्या सद्‌गुरू बाबा महाराज सहस्रबुद्धे विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी एकत्रितपणे स्वच्छता मोहीम राबवून महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली. सुरवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती जोशी व ज्येष्ठ शिक्षक मारुती दराडे यांच्या हस्ते झाले. शिक्षिका चव्हाण यांनी भजन गाऊन कार्यक्रमाची सुरवात केली. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी भाषणातून गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची ओळख करून दिली. या वेळी शिक्षिका उषा शेळके, स्मिता सावंत, कविता ठुबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


एसएनबीपीमध्ये ‘स्वरयज्ञ’ संगीत महोत्सव
पुणे, ता. ४ : एसएनबीपीच्या ‘स्वरयज्ञ’ या २५ तासाच्या संगीत महोत्सवाची सांगता ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर यांच्या गायनाने झाली. एस. ई. सोसायटीच्या स्थापनेला २५ वर्ष पूर्ण झाल्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी अंजली पोहनकर, प्रमोद गायकवाड, सुरेश पत्की, राजेंद्र कुलकर्णी, अरविंद कुमार आझाद, मनीष पिंगळे, नरेश माडगावकर, शैलेश भागवत, संजय गरुड, जितेंद्र भोसले, संतोष घंटे असे संगीत क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्गज कलाकार तसेच, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. के. भोसले, अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले यांसह प्राचार्या, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.