कर्वेरस्ता व्यापारी संघटनेतर्फे शुक्रवारपासून प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्वेरस्ता व्यापारी संघटनेतर्फे शुक्रवारपासून प्रदर्शन
कर्वेरस्ता व्यापारी संघटनेतर्फे शुक्रवारपासून प्रदर्शन

कर्वेरस्ता व्यापारी संघटनेतर्फे शुक्रवारपासून प्रदर्शन

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : कर्वेरस्ता व्यापारी संघटनेतर्फे कोहिनूर मंगल कार्यालय येथे ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान ‘कर्मा स्त्रीशक्ती प्रदर्शना’ चे आयोजन करण्यात आले आहे. खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. महिलांच्या कला कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेस ओमप्रकाश रांका, क्षमा वाघ, नंदकुमार वटवेरा, धीरज अडवानी, तेजस महाडीक आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन सकाळी १०.३० पासून ते रात्री ८.३० पर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये महिलांनी तयार केलेल्या दिवे, कपडे यासह गृहोपयोगी वस्तू मांडण्यात येणार आहेत.‘‘या उपक्रमामुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण होईल,’’ असे क्षमा वाघ यांनी सांगितले. दरम्यान, कर्वे रस्त्यावर असलेल्या फ्लायओव्हर व पार्किंग व्यवस्थेबद्दलही सरकारकडे आक्षेप नोंदवला आहे, असे संघटनेचे ओमप्रकाश रांका यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले.