चिंचवडमध्ये शुक्रवारपासून ‘डिफटेक’ प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवडमध्ये शुक्रवारपासून ‘डिफटेक’ प्रदर्शन
चिंचवडमध्ये शुक्रवारपासून ‘डिफटेक’ प्रदर्शन

चिंचवडमध्ये शुक्रवारपासून ‘डिफटेक’ प्रदर्शन

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : संरक्षण क्षेत्रासाठी आवश्‍यक असलेल्या आधुनिक उत्पादनांचे ‘डिफटेक’ प्रदर्शन शुक्रवारपासून (ता. ७) रविवारपर्यंत (ता. ९) ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे होणार आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए) तर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेली परिषद सर्वांसाठी खुली राहणार असल्याची माहिती एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी दिली. संरक्षण उत्पादनांमध्ये गुंतवणूक, निर्यात, बदलत्या युद्धनीतीनुसार नवनवीन तंत्रज्ञानाची आवश्‍यकता अशा गोष्टींवर परिषदेत भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर संरक्षण उत्पादनात योगदान देणारे उद्योग, टेक्नोक्रॅट्स, तसेच स्टार्टअपसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिषद आणि प्रदर्शनाचा उद्देश आहे. यामध्ये ५० हून अधिक उद्योगांचे प्रदर्शन असून २० पेक्षा जास्त स्टार्टअप्सचा सहभाग असेल.