कर्जाचे अमिष दाखवत ऑनलाइन फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जाचे अमिष दाखवत ऑनलाइन फसवणूक
कर्जाचे अमिष दाखवत ऑनलाइन फसवणूक

कर्जाचे अमिष दाखवत ऑनलाइन फसवणूक

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : तत्काळ कर्ज देण्याची जाहिरात समाजमाध्यमावर प्रसारित करीत प्रक्रिया शुल्क व कमिशनपोटी साडेनऊ हजार रुपये लाटून दोघांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

विठ्ठल बाबू जरांडे (वय ३३, रा. उरुळी देवाची) याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्याविरोधात दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३२ वर्षाच्या नोकरदाराने फिर्याद दिली आहे. हा फसवणुकीचा प्रकार २ ते ४ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन स्वरूपात घडला. आरोपी जरांडे याने समाजमाध्यमात कर्ज देत असल्याची जाहिरात केली होती. त्यावर फिर्यादींनी संपर्क साधला असता, आरोपीने त्यांना एका तासात दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांचे आधार व पॅनकार्ड, ‘कॅन्सल चेक’ आणि एका कागदावर त्यांच्या कामाची माहिती आणि स्वाक्षरीचा नमुना घेतला. त्यानंतर कर्ज मंजुरीसाठी प्रक्रिया शुल्क व कमिशनपोटी पाच हजार २५० रुपये ऑनलाइन स्वरूपात घेतले. त्यानंतर कर्ज मंजूर न करता फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. आरोपीने याच प्रकारे आणखी एकाला चार हजार २५० रुपयांना फसविल्याचे तपासात उघड झाले.