ज्येष्ठांचा सोमवारी आनंद मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठांचा सोमवारी 
आनंद मेळावा
ज्येष्ठांचा सोमवारी आनंद मेळावा

ज्येष्ठांचा सोमवारी आनंद मेळावा

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा सोमवारी (ता. १०) होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ६ दरम्यान स्वारगेटजवळील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हा मेळावा होईल, अशी माहिती जनसेवा फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जनसेवा फौंडेशन पुणे, सामाजिक न्याय व विशेष विभाग महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व सबलीकरण विभाग भारत सरकार, पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारती अभिमत विद्यापीठ, फेस्कॉम, अॅस्कॉप, आय. एल. सी. (आय) पुणे, नवचैतन्य हास्य योग परिवार, भारतीय योग संस्थान, एकता योगा क्लब, मुकुल माधव फौंडेशन, हेल्पेज इंडिया आणि विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांतर्फे मेळाव्याचे संयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला जनसेवा कार्यकारी समितीचे सदस्य मुकुंद उजळंबकर, अॅस्कॉपचे अध्यक्ष मधुकर पवार, अॅस्कॉपचे उपाध्यक्ष दिलीप पवार, फेस्कॉमचे अध्यक्ष अरुण रोडे, नवचैतन्य हास्य योग परिवाराचे विठ्ठल काटे आणि एकता योगा ट्रस्टचे नाना निवंगुणे उपस्थित होते.
खासदार गिरीश बापट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते सकाळी दहाला उद्घाटन होईल. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाअंतर्गत ‘भेट्रया दिग्गजांना’ या ग्रंथाचे प्रकाशन सायंकाळी पाचला राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उद्योगपती कृष्णकुमार गोयल असतील.
-------------