खडकीत उभारणार तात्पुरते बस स्थानक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खडकीत उभारणार तात्पुरते बस स्थानक
खडकीत उभारणार तात्पुरते बस स्थानक

खडकीत उभारणार तात्पुरते बस स्थानक

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः दिवाळीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता एसटी प्रशासनाने टायमिंग गाड्यासह अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले. पुणे विभागाच्या वतीने १५०० अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी खडकी येथे तात्पुरते बस स्थानक उभारले जाणार आहे. येथून मराठवाडा, विदर्भ व खान्देश साठी एसटी सुटणार आहे. तर स्वारगेट येथून पश्चिम महाराष्ट्र तर वल्लभनगरहून कोकणासाठी एसटी धावणार आहे. पुण्यातून दिवाळीच्या काळात सुमारे दोन लाख प्रवाशाची वाहतूक होईल असा अंदाज आहे.
राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीचे नियोजन पूर्ण केले आहे. नेहमी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील खडकी कॅंटोन्मेंट येथील मैदानात तात्पुरते बस स्थानक उभारण्यात येणार आहे. १९ ते २३ ऑक्टोबर दरम्यान दिवाळीचा हंगाम असल्याने या काळात एसटी जादा वाहतूक केली जाईल. शिवाय याच काळात खडकी बस स्थानक कार्यान्वित असेल. १७ ऑक्टोबरपासून येथून काही प्रमाणात वाहतूक सुरु होईल. पुण्याहून सर्वांत जास्त प्रवासी वाहतूक ही विदर्भ व मराठवाडासाठी होते. हे लक्षात घेऊन खडकी ला तात्पुरते बस स्थानक बांधले जात आहे.

या शहरासाठी खडकीहून बस
औरंगाबाद, वर्धा, शेगाव, अहमदनगर, जळगाव, नागपूर,अकोला,बीड, परळी, परभणी, गंगाखेड, जालना, भुसावळ, मनमाड, लातूर, आदी शहरांसाठी तसेच मराठवाडा , विदर्भ व खान्देश साठी येथून गाड्या सुटणार आहे.

स्वारगेट बस स्थानक
स्वारगेट बस स्थानकावरून सोलापूर,कोल्हापूर, सातारा,सांगली, मुंबई, ठाणे, पंढरपूर, बार्शी, मंगळवेढा, उमरगा, अक्कलकोट, आदी शहरांसाठी एसटी सुटेल.

कोकणातल्या गाड्या वल्लभनगर येथून
वल्लभनगर आगारातून कोकणात जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक होणार आहे. यात रत्नागिरी, चिपळूण, कणकवली, मालवण, सिंधुदुर्ग, गुहागर, यासह नाशिक, अकोला,शेगाव ला देखील काही प्रमाणात गाड्या सोडण्यात येणार आहे. त्या प्रमाणे वल्लभनगर आगाराचे नियोजन सुरु आहे. प्रवाशांच्या प्रतिसाद पाहून मार्गात बदल देखील होऊ शकतो.

दिवाळीचे नियोजन पूर्ण झाले आहे. खडकीला दिवाळीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधीपासूनच वाहतूक सुरू होईल. टायमिंग गाड्यांसह सुमारे १५०० अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन आहे. या दिवाळीच्या काळात पुण्यातून सुमारे दोन लाख प्रवासी एसटी ने प्रवासी करतील असा अंदाज आहे.
- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, राज्य परिवहन महामंडळ, पुणे विभाग