एचडीएफसीच्या ‘स्मार्टहब व्यापार’ ॲपचे अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एचडीएफसीच्या ‘स्मार्टहब व्यापार’ ॲपचे अनावरण
एचडीएफसीच्या ‘स्मार्टहब व्यापार’ ॲपचे अनावरण

एचडीएफसीच्या ‘स्मार्टहब व्यापार’ ॲपचे अनावरण

sakal_logo
By

पुणे, ता. ६ः छोट्या व्यावसायिकांना ऑनलाइन पेमेंटबरोबरच बॅंकिंग सुविधा देणाऱ्या ‘स्मार्टहब व्यापार’ या ॲपचे एचडीएफसी बॅंकेतर्फे अनावरण करण्यात आले.बॅंकेचे विभागीय प्रमुख राजा उपाध्याय यांनी याचे पुण्यात अनावरण केले. देशात वाढत चाललेल्या डिजिटल व्यवहारांना ईकॉमर्सची जोड देण्याचा बॅंकेचा हा प्रयत्न आहे.

छोट्या दुकानदारांपासून ते उद्योजकांपर्यंत जमा-खर्चाचा हिशोब ठेवण्याबरोबरच डिजिटल पेमेंट, कर्ज आणि व्यवसाय वृद्धीच्या संधी या एका ॲपमधून मिळतील, असे उपाध्याय यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘ऑनलाईन व्यवहारांकडे आजवर आपण फक्त ग्राहकांच्या नजरेतून पाहत होतो. आता व्यावसायिकांच्या दृष्टीनेही विचार करण्यात आला आहे. वेगाने विस्तारणाऱ्या ई-कॉमर्सचा फायदा छोट्या व्यावसायिकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आहे.’’
ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहारांचे ट्रॅकींग करता येणार आहे, तसेच मोठ्या रकमेचे व्यवहार सहज शक्य होणार आहेत. मुदत ठेव, लघु कर्जे आदी बॅंकिंग सुविधाही मिळणार आहेत.