‘बीएसएनएल’च्या वर्धापनदिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बीएसएनएल’च्या वर्धापनदिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा गौरव
‘बीएसएनएल’च्या वर्धापनदिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा गौरव

‘बीएसएनएल’च्या वर्धापनदिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा गौरव

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) दिवसाचे औचित्य साधून ‘अखिल भारतीय पदवीधर अभियंता’ आणि ‘दूरसंचार अधिकारी संघटने’तर्फे पुणे जिल्ह्यातील २४ कनिष्ठ अभियंत्यांचा गौरव करण्यात आला. कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल पुणे व्यवसाय क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक अनिल धानोरकर यांच्या हस्ते अभियंत्यांना मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सातारा रस्त्यावर असलेल्या बीएसएनएलच्या मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या निमित्ताने सर्वांना मार्गदर्शन केले तसेच बीएसएनएलच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. संघटनेचे संयुक्त सचिव कमलेश देव, महाराष्ट्र सचिव पी. मॅथ्यु, पुणे अध्यक्ष नितीन पिसे, सचिव वैभव भांगरे आणि कल्याणचे अध्यक्ष प्रशांत बाविस्कर यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शंतनू ओक व सहायक सचिव जालंधर सिंग या वेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमन गुप्ता यांनी केले. सविता गुप्ता यांनी आभार मानले.