अभियांत्रिकीची तात्पुरती गुणवत्ता यादी आज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभियांत्रिकीची तात्पुरती गुणवत्ता यादी आज
अभियांत्रिकीची तात्पुरती गुणवत्ता यादी आज

अभियांत्रिकीची तात्पुरती गुणवत्ता यादी आज

sakal_logo
By

पुणे, ता. ६ :
अभियांत्रिकी पदवी (बी.ई/बी.टेक) आणि पदव्युत्तर पदवी (मास्टर ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतील तात्पुरती गुणवत्ता यादी शुक्रवारी (ता.७) जाहीर होणार आहे.
राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित, विद्यापीठांशी संलग्न, विद्यापीठातील विभाग आणि विनाअनुदानित महाविद्यालये यांमध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाली. पहिल्या टप्प्यात प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया घेण्यात आली. आता केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) तात्पुरती गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात येत आहे. या यादीवर आक्षेप आणि हरकती नोंदविण्यासाठी शनिवार (ता.८) ते सोमवार (ता.१०) पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी येत्या बुधवारी (ता.१२) अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता ‘कॅप’अंतर्गत प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या होणार आहेत. प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी १२ ते २१ ऑक्टोबर, दुसरी फेरी २२ ते ३१ ऑक्टोबर आणि तिसरी फेरी १ ते ९ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये, संस्थांचे शैक्षणिक वर्ष एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याची सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://cetcell.mahacet.org/