पुणे-नागपूर, अमरावती रेल्वे पुन्हा धावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-नागपूर, अमरावती
रेल्वे पुन्हा धावणार
पुणे-नागपूर, अमरावती रेल्वे पुन्हा धावणार

पुणे-नागपूर, अमरावती रेल्वे पुन्हा धावणार

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः रेल्वे प्रशासनाने रद्द केलेल्या पुणे-नागपूर व पुणे-अमरावती या दोन्ही रेल्वे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आरक्षण प्रणालीत या दोन रेल्वेचा समावेश होताच अवघ्या तासांतच रेल्वे फुल्ल झाल्या. आता या गाड्यांना नोव्हेंबरपर्यंत वेटिंग सुरु झाली आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असताना देखील रेल्वे प्रशासनाने या रेल्वे रद्द केल्या होत्या. रेल्वे रद्द केल्याने प्रवाशाची मोठी गैरसोय होणार होती़, मात्र प्रशासनाने दोन रेल्वे रद्दचा निर्णय मागे घेतला.
सोलापूर रेल्वे विभागातील दौंड-मनमाड सेक्शन दरम्यान नॉन इंटरलॉकिंगचा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यासाठी विविध रेल्वे रद्द करण्यात आल्या. यात पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे चा देखील समावेश आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर नागपूर, अमरावतीला जाणाऱ्या रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रद्द करण्यात आलेल्या गाड्या पैकी २ रेल्वे पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी त्या दोन्ही रेल्वेचे आरक्षण सुरु होताच काही तासातच पूर्ण ऑक्टोबर महिन्याचे आरक्षण फुल्ल झाले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंत या दोन्ही रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले आहे. यावरून या दोन्ही रेल्वेला प्रवाशांचा किती चांगला प्रतिसाद आहे, हे लक्षात येते.