वेश्‍याव्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेश्‍याव्यवसाय करणाऱ्या
स्पा सेंटरवर कारवाई
वेश्‍याव्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर कारवाई

वेश्‍याव्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर कारवाई

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्‍याव्यवसाय सुरु ठेवणाऱ्या एका स्पा सेंटरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाई केली. त्यामध्ये स्पा सेंटरचा मालक व व्यवस्थापक यांना अटक करण्यात आली, तर चार परदेशी तरुणींची सुटका करण्यात आली.
अमीर अब्दुसुबन हुसेन (वय २२, रा. येरवडा), नवाज लालुमिया उद्दीन (वय २१, रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तर त्यांच्यासह अन्य चार साथीदारांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार अजय राणे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अवयान स्पा सेंटर नावाचे मसाज सेंटर असून, तेथे वेश्‍याव्यवसाय सुरु असल्याची खबर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे बनावट ग्राहक पाठवून खात्री केली, तेव्हा तेथे वेश्‍याव्यवसाय सुरु असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकून दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. तर चार परदेशी तरुणींची सुटका केली. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पिडीत महिलांकडून मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्‍याव्यवसाय करून घेत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. पोलिस उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलिस कर्मचारी मनिषा पुकाळे, प्रमोद मोहिते, अजय राणे, संदीप कोळगे यांच्या पथकाने कारवाई केली.