सेवा पंधरावड्यामध्ये ५८ हजार वीजजोडण्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवा पंधरावड्यामध्ये 
५८ हजार वीजजोडण्या
सेवा पंधरावड्यामध्ये ५८ हजार वीजजोडण्या

सेवा पंधरावड्यामध्ये ५८ हजार वीजजोडण्या

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा’ या पंधरवड्यात महावितरणने ५८ हजार ४५७ घरगुती ग्राहकांना नवीन वीजजोडण्या दिल्या आहेत. याशिवाय प्रलंबित असलेल्या ४४ हजार ६६९ ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्याचे सर्व अर्ज निकाली काढण्याचे काम पूर्ण केले आहे.
महावितरणकडून या पंधरवड्यात ग्राहकांच्या प्रलंबित असलेल्या विशेषतः नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करणे, या प्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले होते. त्यानुसार महावितरणने नवीन वीजजोडणीसोबतच ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली होती. नवीन ग्राहकांना वीजजोडणीसाठी रहिवासी असल्याच्या एखाद्या दाखल्यासोबत सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागते. तसेच वीजबिलावरील नावात बदल करण्यासाठी
स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले होते. त्यानुसार दाखल ५८ हजार ४५७ नवीन घरगुती वीजजोडणीच्या अर्जावर त्वरित कार्यवाही करण्यात आली तर वीजजोडण्या देऊन १०० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.
----------------
घरगुती ग्राहकांना वीजजोडण्या दिलेल्या अर्जाची प्रादेशिकनिहाय संख्या पुढीलप्रमाणे
औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ९ हजार ५२८, कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत २५ हजार ६८५, नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत १४ हजार ९७५ आणि पुणे प्रादेशिक कार्यालयांतर्गत ९ हजार ६७३ नवीन घरगुती वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
------------
वीजबिलावरील नावात बदल करण्यात आलेल्या अर्जाची प्रादेशिकनिहाय संख्या पुढीलप्रमाणे
औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ३ हजार २८५, कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत २० हजार २८३, नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत ६ हजार ३०० आणि पुणे प्रादेशिक कार्यालयांतर्गत १४ हजार ८०१ ग्राहकांचा समावेश आहे.
----------