लोकमान्य सोसायटीकडून ‘शुभदीप, शुभपर्व’ योजना सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकमान्य सोसायटीकडून ‘शुभदीप, शुभपर्व’ योजना सादर
लोकमान्य सोसायटीकडून ‘शुभदीप, शुभपर्व’ योजना सादर

लोकमान्य सोसायटीकडून ‘शुभदीप, शुभपर्व’ योजना सादर

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : श्रावण महिन्यापासून सुरू झालेला सणांचा झगमगाट अगदी दीपावलीपर्यंत उजळून निघतो. हे सणवार आपल्याला जगण्याची नवी ऊर्मी देतात, नवी प्रेरणा देतात. सण गुंतवणुकीच्या माध्यमातून अधिक संस्मरणीय करण्याच्या दृष्टीने लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीने ‘शुभदीप’ आणि ‘शुभपर्व’ या दोन ठेव योजना सादर केल्या आहेत.

‘शुभपर्व’ या गुंतवणूक योजनेत ग्राहक व सभासदांना गुंतवणुकीवर ९ टक्के इतका व्याजदर मिळणार आहे. योजनेचा कालावधी २७ महिने आहे. तर ‘शुभदीप’ या गुंतवणूक योजनेत ग्राहक व सभासदांना गुंतवणुकीवर ८.७५ टक्के इतका व्याजदर मिळणार आहे. ही योजना १५ महिन्यांसाठी आहे. ग्राहक, सभासद दोन्ही योजनेत १० हजार रुपये आणि अधिकची गुंतवणूक करू शकतात. या दोन्ही योजना ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सुरू राहणार आहेत.

गुंतवणूकदार घरबसल्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून (www.lokmanyaonline.com) देखील या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकतात. ‘लोकमान्य सोसायटी’च्या कोणत्याही शाखेत किंवा १८०० २१२ ४०५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ठेवीदार, सभासद, गुंतवणुकदारांना या योजनेचा लाभ घेता येईल, अशी माहिती ‘लोकमान्य सोसायटी’तर्फे देण्यात आली.