अजूनही ७० टक्के ‘वर्क फ्रॉम होम’ नेसेन्ट इनफॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लाईज सिनेटची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अजूनही ७० टक्के ‘वर्क फ्रॉम होम’ 
नेसेन्ट इनफॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लाईज सिनेटची माहिती
अजूनही ७० टक्के ‘वर्क फ्रॉम होम’ नेसेन्ट इनफॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लाईज सिनेटची माहिती

अजूनही ७० टक्के ‘वर्क फ्रॉम होम’ नेसेन्ट इनफॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लाईज सिनेटची माहिती

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : वर्क फॉर्म होम करीत असताना मुनलाइटिंग करीत असल्याचे कारण देत ऑफिसला येण्याची केलेली सक्ती. वारंवार ऑफिसला येण्याची केलेली विनंती. तसेच हायब्रीड पद्धतीने सुरू केलेले काम. यानंतरही सध्या मोठ्या प्रमाणात आयटीयन्स घरूनच काम करीत आहेत. यंदाची तिसरी तिमाही संपेपर्यंत (सप्टेंबर अखेरीस) ८० ते ९० टक्के आयटीयन्स ऑफिसमध्ये आलेले असतील, असा अंदाज आयटी कंपन्यांनी बांधला होता. मात्र त्याची पूर्ती झालेले दिसत नाही.
कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये येऊन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र आजही ७० टक्के नोकरदार हायब्रीड किंवा पूर्णतः वर्क फार्म होम करीत आहेत, अशी माहिती आयटीमधील कामगार संघटना नेसेन्ट इनफॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लाईज सिनेटकडून देण्यात आली.
ऑफिसला बोलविण्यासाठी आयटीयन्सला हायब्रीड (आठवड्यातील काही दिवस ऑफीस व काही दिवस घरून काम) पद्धतीने देखील काम सुरू करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने ऑफिसमधील कामाचे दिवस वाढवायचे आणि घरून काम कायमचे बंद करायचे, अशी युक्ती देखील काही कंपन्यांनी लढवली आहे. मात्र कामाच्या या पद्धतीला देखील अनेकांनी विरोध केला आहे. ऑफिसमध्ये येऊन काम करणे बंधनकारक केले तर आम्ही ग्रुपने राजीनामा देवू, असे अनेकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आयटीयन्सला ऑफिसला बोलवताना कंपन्या देखील खबरदारी घेत आहेत.

घरून कामाला पसंतीची कारणे
- प्रवास टाळता येतो
- आपल्या वेळेत व सोयीने काम करता येते
- प्रवास खर्च वाचतो
- आवड व छंद जोपासण्यास वेळ मिळतो
- कुटुंबाला वेळ देता येतो

इतर क्षेत्रातही तीच स्थिती :
घरून काम करणाऱ्या नोकरदारांमध्ये आयटीयन्सचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र त्यासह बँकिंग, टेलिकॉम, सेवा क्षेत्र यासह तांत्रिक बाबीचे काम करणाऱ्या क्षेत्रातीलही अनेक नोकरदार घरून काम करीत आहेत.

वरिष्ठांना वर्क फॉर्म ऑफिस बंधनकारक :
घरून किंवा हायब्रीड पद्धतीने काम करणाऱ्यांत कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा टक्का सर्वाधिक आहे. तर वरिष्ठ पातळीवर काम करणाऱ्यांना गेल्या वर्षापासून ऑफिसला येऊन काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वरिष्ठ ऑफिसला येऊन कामाचे नियोजन करून त्यानुसार काम करून घेतील या विचाराने वरिष्ठांना ऑफिसला बोलावले जात आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मी एका नवीन कंपनीत जॉईन झालो होतो. तेव्हा मला पुढील किमान दोन वर्ष वर्क फार्म होम राहील, असे सांगण्यात आले होते. मात्र आता ऑफिसला येण्यास सांगितले आहे. मी अजून घरून काम करीत आहे. मात्र आता लवकरच ऑफिसला जावे लागणार, असे वाटत आहे.
तन्मय, आयटीयन