किमान साधनसामुग्रीमध्ये कमाल उत्पादनावर भर द्या डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा अभियंत्यांना कानमंत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किमान साधनसामुग्रीमध्ये
कमाल उत्पादनावर भर द्या
डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा अभियंत्यांना कानमंत्र
किमान साधनसामुग्रीमध्ये कमाल उत्पादनावर भर द्या डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा अभियंत्यांना कानमंत्र

किमान साधनसामुग्रीमध्ये कमाल उत्पादनावर भर द्या डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा अभियंत्यांना कानमंत्र

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : आजच्या युगात अभियांत्रिकी अनेक शाखांबरोबर जोडले गेले आहे. त्यामुळे अभियंत्यांनी व्यापक, सर्वसमावेशक आणि बहुशाखीय दृष्टिकोन अंगिकारायला हवा. आपल्या कामाचा जगाला, देशाला आणि समाजाला कसा फायदा होईल, तसेच किमान साधन सामुग्रीमध्ये कमाल उत्पादन कसे देता येईल, यावर अभियंत्यांनी लक्ष केंद्रित करावे, असा कानमंत्र ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिला.
पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये ‘इलेक्ट्रिक व्हेईकल टेस्टिंग आणि रोबोटिक्स-ऑटोमेशन लॅब’चे उद्‌घाटन डॉ. माशेलकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी वैशाली माशेलकर, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे, उपकार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, खजिनदार आनंद कुलकर्णी, कुलसचिव अमोल जोशी, संचालक प्रा. राजेंद्र कडुसकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज तारांबळे आदी उपस्थित होते. ‘‘ईव्ही तंत्रज्ञानातील सध्याचा ट्रेंड पाहता, विद्यार्थीभिमुख शिक्षणासाठी अत्याधुनिक सुविधांची पूर्तता करण्यासाठी ही लॅब उपयुक्त ठरेल,’’ असे डॉ. माशेलकर यांनी नमूद केले.
रेडेकर म्हणाले, ‘‘प्रयोगशाळांच्या उभारणीत नामांकित कंपन्यांनी भरीव आर्थिक व तांत्रिक मदत केली आहे. औद्योगिक गरजा लक्षात घेऊन, अत्याधुनिक, विद्यार्थी केंद्रित मॉड्युलर अभ्यासक्रम, संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतले जाणार आहे. समाजोपयोगी, शेतीसाठी रोबोट प्रणाली, सांडपाणी निचरा अनुप्रयोग, संगणक दृष्टी प्रणालीसह इतर कामांसाठी रोबो वापरण्याचे प्रयोजन आहे.’’