‘डेटा अॅनालिसिस’मध्ये घडवा करिअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डेटा अॅनालिसिस’मध्ये घडवा करिअर
‘डेटा अॅनालिसिस’मध्ये घडवा करिअर

‘डेटा अॅनालिसिस’मध्ये घडवा करिअर

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : डेटा अॅनालिटिक्स प्रक्रियेद्वारे वेगवेगळे टूल्स वापरून डेटा तयार केला जातो आणि त्याचे विश्लेषण केले जाते. या डेटाने मिळालेल्या इन्साईट व्यवसायाशी संबंधित निर्णय घेण्याच्या हेतूंसाठी वापरल्या जातात. कंपन्या आता अधिक तंत्रज्ञान-चालित आणि वेगवान होत असल्याने, डेटा अनॅलिस्ट्स कर्मचाऱ्यांच्या शोधात आहेत. २०२२ मध्ये एकूण डेटा पूर्वीपेक्षा ५० पटीने अधिक होण्याचा अंदाज आहे. कंपन्यांना मोठ्या प्रमाणातील डेटाच्या उपलब्धतेसह अद्ययावत राहावे लागेल, जेणेकरून त्या स्पर्धेत मागे राहणार नाहीत. म्हणून, डेटा अनॅलिसिसमध्ये पारंगत असलेले तज्ज्ञ कंपन्यांना उपलब्ध डेटा विश्लेषणानुसार त्यांचे व्यवसाय मॉडेल ॲडजस्ट करण्यासाठी आणि स्पर्धेच्या वातावरणात नेहमीच एक पाऊल पुढे राहण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. ‘डेटा अॅनालिसिस’ या आघाडीच्या क्षेत्रात करिअर घडविण्यास मदत करणारा अभ्यासक्रम १० ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ५१,००० रुपये.
संपर्क : ७३५०००१६०३.

पायथन प्रोग्रॅमिंग ऑनलाइन प्रशिक्षण
वेब व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी पायथन ही सर्वात सोपी व प्रमाणित प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. म्हणूनच प्रोग्रॅमिंग बिगिनर्ससाठी पायथन परफेक्ट ऑप्शन आहे. हाय-लेव्हल, इंटरप्रिटेड व ऑब्जेक्ट-ओरिएंटेड आर्किटेक्चर असल्याने पायथन सर्व प्रकारच्या सॉफ्टवेअर सोल्यूशन्ससाठी आयडियल लँग्वेज आहे. याबबतचे ऑनलाइन प्रशिक्षण १५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. यामध्ये पायथन सॉफ्टवेअरचे इन्स्टॉलेशन व सेटअप, प्रोग्रॅमिंग टेक्निक, चार्ट व ग्राफ्स आदींविषयी मार्गदर्शन केले जाईल. मशिन लर्निंग व डेटा सायन्समध्ये वापर होत असल्याने पायथन डेव्हलपर्सना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. हे प्रशिक्षण लेटेस्ट व्हर्जनवर आधारित व पायथन डेव्हलपर बनू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ७,००० रुपये.
संपर्क : ७३५०००१६०३

लोगो- एसआयआयएलसी

फळे, भाजीपाला ‘फ्रोजन’ तंत्रज्ञान
पुणे, ता. ८ : शेतमाल साठवणूकीतील महत्त्वाच्या फ्रोजन तंत्रज्ञानाविषयी माहिती करून देणारी कार्यशाळा १५ व १६ ऑक्टोबर रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत अन्नतंत्रज्ञान सेक्टरमधील महत्त्वाच्या फ्रोजन तंत्रज्ञानाची तोंडओळख, त्यातील ट्रेन्ड्स, मशिनरी, प्रक्रिया, पॅकेजिंग, एफएसएसएआय, हॅसेप प्रमाणपत्र प्रक्रिया, हायजिन व सॅनिटेशन, फ्रोझन युनिटसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, स्टॅच्युटरी व रेग्युलेटरी रिक्वायरमेंट, प्रॉडक्ट रेंज व संधी, फ्रोजन फूड एक्स्पोर्ट मार्केटिंग, प्रोजेक्ट फिझीबीलीटी तसेच टेक्नो कमर्शिअल ॲनॅलिसिस इ.विषयी फूड प्रोसेसिंग विषयातील नामवंत तज्ज्ञ राजन वारे मार्गदर्शन करणार आहेत. बी.टेक, एम.टेकचे विद्यार्थी तसेच शेतकरी, व्यावसायिक, नवउद्योजक, स्टार्टअप करू इच्छिणारे यात सहभागी होऊ शकतात. प्रतिव्यक्ती शुल्क रुपये ४,५०० रुपये (चहा, जेवण, प्रशिक्षण साहित्य, प्रमाणपत्र) असून आगाऊ नोंदणी केल्यास ५०० रुपये सवलत मिळेल.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१
कार्यशाळेचे ठिकाण : मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट नं. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे.