‘अर्ली इंटरव्हेंन्शन सेंटर’चे उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अर्ली इंटरव्हेंन्शन सेंटर’चे उद्‌घाटन
‘अर्ली इंटरव्हेंन्शन सेंटर’चे उद्‌घाटन

‘अर्ली इंटरव्हेंन्शन सेंटर’चे उद्‌घाटन

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : इनोसंट टाइम्स स्कूल आणि अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स यांच्या औंध येथील ‘अर्ली इंटरव्हेशन सेंटर’चे उद्‌घाटन नुकतेच झाले. राज्याच्या समाजकल्याण विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. दिनेश डोके, इनोसंट टाइम्स स्कूलच्या संस्थापक डॉ. अंकिता संघवी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यानिमित्त ‘सुपर हिरो कार्निव्हल’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दोन ते तेरा वर्ष वयातील मुलांसाठी सुपरमॅन, बॅटमॅन, आयर्न मॅन अशा सुपरहिरोंशी संबंधित खेळांचे आयोजन केले होते. डॉ. डोके म्हणाले, ‘‘स्वमग्न (ऑटिस्टिक) बालकांची संख्या वाढत आहे. प्रत्येक स्वमग्न मुलं हे वेगळे असते, स्वतंत्र असते आणि त्याचे प्रश्न वेगळे असतात. त्यांना शिकवणे आणि काळजी घेणे हे फार मोठे आव्हान आहे. अशा बालकांना लागणाऱ्या विशेष सुविधांचे हे केंद्र आहे. स्वयंसेवी संस्था, खासगी क्षेत्र यांनी पुढे येऊन यात योगदान द्यावे.’’ प्रत्येक जिल्ह्यात ऑटिस्टिक सेंटर झाले पाहिजे, असेही आशा डॉ. डोके यांनी व्यक्त केली.