इंग्लंडमध्ये राहणाऱ्या महिलेची जमीन लाटण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंग्लंडमध्ये राहणाऱ्या महिलेची जमीन लाटण्याचा प्रयत्न
इंग्लंडमध्ये राहणाऱ्या महिलेची जमीन लाटण्याचा प्रयत्न

इंग्लंडमध्ये राहणाऱ्या महिलेची जमीन लाटण्याचा प्रयत्न

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : इंग्लंड येथे राहत असलेल्या महिलेच्या बनावट सह्या करीत वडिलोपार्जित जमीन लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन वकिलांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एका वकिलासह पाच जणांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
बबन लक्ष्मण फाटक, दत्तात्रेय लक्ष्मण फाटक, अमित अशोक फाटक व अभिजित अशोक फाटक (सर्व रा. भुशी, ता. मावळ) आणि वकील विकास पंढरीनाथ थोरात (रा. नाशिक) असे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आणखी दोघांविरोधात गुन्हा दाखल असून न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी इंग्लंडस्थित एका ज्येष्ठ नागरिक महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादींची मावळ तालुक्यातील भुशी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. आरोपींनी जानेवारी २०२० ते जानेवारी २०२२ या दरम्यान फिर्यादींच्या नावे असलेल्या मिळकतीवर कुळ लावण्याकरिता तहसीलदार मावळ यांचे न्यायालयात कुळकायदा अंतर्गत दावा दाखल केला. तसेच फिर्यादी या ज्या ठिकाणी राहायला नाहीत, त्या पत्त्यावर नोटीस काढल्या. फिर्यादी या दाव्यासाठी हजर राहत नाहीत, असे दाखविल्याने मार्च २०२१ मध्ये निकाल आरोपींच्या बाजूने लागला आहे. त्यानंतर फिर्यादी या इंग्लंडमध्ये राहत असतानाही कुळकायद्यान्वये स्वत:ची नावे लावून घेतली, असे फिर्यादीत नमूद आहे. या गुन्ह्यात पाच आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यास सहायक सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला.