पुण्यात लवकरच सीड बँकेची निर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात लवकरच
सीड बँकेची निर्मिती
पुण्यात लवकरच सीड बँकेची निर्मिती

पुण्यात लवकरच सीड बँकेची निर्मिती

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः महाराष्ट्रात सह्याद्री देवराईच्या सहकाऱ्यांच्या योगदानाने वृक्षारोपणाचे प्रमाण वाढत आहे. यासाठी वन विभाग देखील सहकार्य करत असून संस्थेच्या वतीने पुण्यात सीड बँकेची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती अभिनेते व देवराई संस्थेचे प्रमुख सयाजी शिंदे यांनी दिली.
सह्याद्री देवराई संस्थेतर्फे आयोजित ‘वृक्ष संवाद २०२२’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यशस्वी वृक्ष लागवड करणाऱ्यांचा, सह्याद्री देवराई संस्थेच्या कृतिशील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच देशी वृक्षांच्या बियांचे प्रदर्शनही यावेळी मांडण्यात आले होते. संस्थेने महाराष्ट्रात १० लाख वृक्ष लागवड केल्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली. तसेच संस्थेच्या www.sahyadridevrai.org या संकेतस्थळाचे उद्‍घाटन करण्यात आले. या प्रसंगी पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, लेखक अरविंद जगताप, डॉ. चंद्रकांत साळुंखे, श्रीकांत इंगळहळ्ळीकर, धनंजय शेडबाळे , विजय निंबाळकर, मधुकर फल्ले आदी कार्यक्रमात उपस्थित होते. निसर्ग संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन चंदन यांनी केले.