विनाअनुदानित महाविद्यालयांच्या समस्यांबाबत प्र-कुलगुरूंची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या
समस्यांबाबत प्र-कुलगुरूंची भेट
विनाअनुदानित महाविद्यालयांच्या समस्यांबाबत प्र-कुलगुरूंची भेट

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या समस्यांबाबत प्र-कुलगुरूंची भेट

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः विनाअनुदानित महाविद्यालयांच्या अडचणींबाबत संस्थाचालकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांची भेट घेतली. महाविद्यालयांच्या नव्या शाखांसंबंधीचा प्रश्न, शुल्कवाढ, बृहत् आराखड्याच्या मुदतवाढीसंदर्भात विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
यानिमित्त पार पडलेल्या बैठकीला विनाअनुदानित महाविद्यालयाच्या संघटनेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, जाधवर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. सुधाकर जाधवर, डॉ. नितीन घोरपडे आदी उपस्थित होते. झोळ म्हणाले, ‘‘महाविद्यालयाचे शुल्क हे महागाई निर्देशांकाप्रमाणे वाढ करण्यात यावे, महाविद्यालयात नवीन शाखा चालू करण्यासाठी प्राचार्य हे पद विद्यापीठ मान्य लागते. ते पद विद्यापीठ मान्य नसेल तर नवीन शाखेसाठी विद्यापीठ मान्यता देण्यात येत नाही. तरी या एका पदाची मान्यता लवकर द्यावी, जेणेकरून संस्थांना नवीन शाखा चालू करण्यासाठी अडचण येणार नाही.’’ प्र-कुलगुरूंशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच याविषयी तोडगा निघेल अशी आम्हाला अपेक्षा असल्याचेही संस्थाचालकांनी म्हटले आहे.