पुणे-पानिपत दुचाकी अभिवादन मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-पानिपत दुचाकी अभिवादन मोहीम
पुणे-पानिपत दुचाकी अभिवादन मोहीम

पुणे-पानिपत दुचाकी अभिवादन मोहीम

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः पानिपतचे तिसरे युद्ध म्हणजे मराठ्यांची हार नसून उलट मराठ्यांच्या इतिहासातील सर्वोच्च पराक्रमाची गाथा आहे. या भावनेतून पानिपतला जाऊन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘सशक्त भारत’ या समूहातर्फे पुणे ते पानिपत दुचाकी अभिवादन मोहिमेचे आयोजन केले आहे.
या मोहिमेला पुण्यातील शनिवारवाड्याच्या मैदानातून ६ जानेवारी २०२३ ला प्रारंभ होईल. ही दुचाकी मोहीम २६१ वर्षांपूर्वी मराठ्यांच्या फौजा ज्या मार्गाने गेल्या, त्याच मार्गाने प्रवास करत १४ जानेवारी २०२३ ला पानिपतवर पोचेल. तेथे राष्ट्रसमर्पण जागरण सभा घेऊन मोहीम संपेल. परतीच्या मार्गात पानिपतवर प्रज्वलित केलेली सौर्यज्योत घेऊन १६०० किलोमीटरचे अंतर केवळ तेरा दिवसांत पावत धावत पार करण्यात येईल. प्रजासत्ताकदिनी म्हणजेच २६ जानेवारीला पुण्यात ही ज्योत परतेल. या संपूर्ण मोहिमेत एकूण ३७ भुईकोट व ७ गिरीदुर्गांचे सखोल अध्ययन करताना २७ तीर्थक्षेत्रांचेही दर्शन घेतले जाणार आहे.
या मोहिमेत आपापल्या वाहनांनी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी www.sashaktabharat.com या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी ९६२३१३८९९९ किंवा ८८७९१२४२१३ या क्रमांकावर संपर्क साधावा. पानिपताच्या गौरवशाली घटनेचे स्मरण करत राष्ट्रीय एकतेच्या भावनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आयोजित या मोहिमेत मराठी युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.