नागरिकांच्या सोयीसाठी परिपूर्ण व्यवस्था देणे गरजेचे ः हर्डीकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागरिकांच्या सोयीसाठी परिपूर्ण 
व्यवस्था देणे गरजेचे ः हर्डीकर
नागरिकांच्या सोयीसाठी परिपूर्ण व्यवस्था देणे गरजेचे ः हर्डीकर

नागरिकांच्या सोयीसाठी परिपूर्ण व्यवस्था देणे गरजेचे ः हर्डीकर

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : ‘‘ई -प्रणालीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणीचे कामकाज झाले पाहिजे. ही प्रणाली वकिलांसाठी मारक नाही. नागरिकांच्या सोयीसाठी परिपूर्ण व्यवस्था देण्याबरोबरच त्यांचे खेटे कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे’’, असे मत राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले. पुणे बार असोसिएशन (पीबीए) व ‘कै. के. टी. गिरमे जन्मशताब्दी समिती’तर्फे यशदा येथे नोंदणी प्रक्रियेसंबंधी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

हर्डीकर म्हणाले, ‘‘वकील वर्ग व अधिकारी यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. तसेच वकील बांधवांकडून सहकार्याची अपेक्षा असून, दोघांच्या माध्यमातून कामासाठी उत्तम वातावरण तयार करणे गरजेचे आहे. वकील हा नागरिकांचा आवाज व एकप्रकारे संरक्षक असतो. त्यांच्याकडून नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा असतात. त्यामुळे त्यांच्या हितासाठी काम केले पाहिजे. थोरवे म्हणाले की, नोंदणी प्रक्रिया करीत असताना वकिलांना सन्मानजनक वागणूक मिळत नाही. विनाकारण अडवणूक केली जाते तसेच डाटा एंट्री प्रक्रियेत सुधारणा व्हावी व अद्ययावत यंत्रणा असणे गरजेचे आहे. या वेळी पीबीएचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे, ॲड. अमित गिरमे, सह जिल्हा निबंधक व नोंदणी महानिरीक्षक संतोष हिंगणे, ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. कर्जतकर, ॲड. प्रवीण नलावडे, ॲड. दिलीप जगताप आणि पीबीएचे उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे आदी उपस्थित होते. पीबीएचे उपाध्यक्ष ॲड. लक्ष्मण येळे-पाटील यांनी सूत्रसंचालन केले.