चुकवू नये असे काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुकवू नये असे काही
चुकवू नये असे काही

चुकवू नये असे काही

sakal_logo
By

१) ‘अजिंठा’ कवितेचे अभिवाचन ः
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि लपझप प्रॉडक्शन, पुणे यांच्यातर्फे ना. धों. महानोर लिखित ‘अजिंठा’ या दीर्घ कवितेच्या अभिवाचनाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. अक्षय वाटवे, माधवी तोडकर, उदय देशपांडे हे कलाकार लोकवांद्यांचा समावेश असलेले पार्श्वसंगीत व पूरक प्रकाशयोजनेसह हे सादरीकरण करणार आहेत.
कधी ः शनिवार (ता. १५)
केव्हा ः सायंकाळी ६.०० वाजता
कुठे ः ॲम्फी थिएटर, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, विधी महाविद्यालय रस्ता

२) ‘भीमपलास’ ः
पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी ‘भीमपलास’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील काही दिग्गज व काही तरुण कलाकार सादरीकरण करतील. यात ज्येष्ठ गायक पं. एम. व्यंकटेश कुमार, पं. गणपती भट्ट, पं. जयतीर्थ मेवुंडी, गायिका शिवानी मिरजकर, बासरीवादक षड्ज गोडखिंडी आणि सतारवादक उस्ताद मोहासीन खान यांचा समावेश आहे.
कधी ः रविवार (ता. १६)
केव्हा ः सकाळी ९.३० वाजता
कुठे ः शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह, कन्नडा संघ, एरंडवणे

३) ‘मूडस् ॲण्ड मेलडी’ ः
ज्येष्ठ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य व प्रख्यात संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर आणि त्यांचे पुत्र युवा संतूरवादक निनाद दैठणकर यांच्या ‘मूडस् ॲण्ड मेलडी’ या संतूर वादन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. एकाचवेळी शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि फ्यूजन या संगीत प्रकारांचा आस्वाद या कार्यक्रमातून रसिकांना घेता येईल.
कधी ः रविवार (ता. १६)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड

४) चित्र प्रदर्शन ः
वास्तुविशारद शिरीष दसनूरकर यांचे अॅक्रिलिक आणि जल-रंगांद्वारे रेखाटलेल्या निसर्गचित्रे आणि अॅब्सट्रक्ट प्रकारातील चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तसेच, प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवारी (ता. १५) सायंकाळी ५ वाजता ‘शिरीषरंग’ या दासनूरकर यांनी रेखाटलेल्या चित्रांचा समावेश असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे होणार आहे.
कधी ः रविवार (ता. १६)
केव्हा ः सकाळी ९ ते रात्री ८:३०
कुठे ः रंगदर्शन कलादालन, ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक रस्ता

५) ‘सूरमयी सतार’ ः
पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचतर्फे ‘सूरमयी सतार’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सतारवादक संजय देशपांडे सादरीकरण करतील. त्यांना विनायक नाईक तबल्यावर साथ देतील.
कधी ः सोमवार (ता. १७)
केव्हा ः सायंकाळी ५ वाजता
कुठे ः पूना गेस्ट हाऊस, लक्ष्मी रस्ता