गुंतवणूकीचे आमिष दाखवत १५ लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुंतवणूकीचे आमिष दाखवत १५ लाखांची फसवणूक
गुंतवणूकीचे आमिष दाखवत १५ लाखांची फसवणूक

गुंतवणूकीचे आमिष दाखवत १५ लाखांची फसवणूक

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : म्युच्युअल फंडात गुंतवणुकीच्या आमिषाने वृद्ध महिलेची १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अजित दिनकर मोरे (वय ४२, रा. साईरत्न अपार्टमेंट, नवले पुलाजवळ, आंबेगाव बुद्रूक) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ज्येष्ठ महिलेने याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोरे याने फिर्यादींशी संपर्क साधत म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. वृद्ध महिलेने आरोपी मोरेला म्युच्युअल फंडात गुंतवणुकीस १५ लाख रुपये दिले होते. मात्र, मोरेला पैसे दिल्यानंतर महिलेला त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचा परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.