येरवडा मनोरुग्णालयात अल्पवयीन मुलावर अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येरवडा मनोरुग्णालयात 
अल्पवयीन मुलावर अत्याचार
येरवडा मनोरुग्णालयात अल्पवयीन मुलावर अत्याचार

येरवडा मनोरुग्णालयात अल्पवयीन मुलावर अत्याचार

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका रुग्णाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयातील पर्यवेक्षकांनी याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित आरोपीवर गेल्या काही वर्षांपासून या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अल्पवयीन मुलालाही उपचारासाठी येथे दाखल करण्यात आले होते. अल्पवयीन मुलावर संशयित आरोपीने अत्याचार केले. मुलाने आरडाओरडा केल्यानंतर रुग्णालयातील रक्षकांनी कक्षात धाव घेतली होती. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.