फटाक्यांबाबत नियमावली जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फटाक्यांबाबत
नियमावली जाहीर
फटाक्यांबाबत नियमावली जाहीर

फटाक्यांबाबत नियमावली जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : दिवाळीत फटाक्यांबाबत पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात फटाके विक्री दुकानांना परवानगी देण्यात आली आहे; मात्र फटाके विक्री स्टॉल परिसरात आतषबाजी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
याबाबत केंद्र तसेच राज्य सरकराने आदेश दिले आहेत. या आदेशाचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे. महाराष्ट्र शस्त्र अधिनियमाद्वारे कागदात स्फोटक पदार्थ ठेवलेले फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या फटाक्यांच्या विक्रीस देखील मनाई आहे.

हे लक्षात ठेवा
- १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणारे फटाके फोडण्यास मनाई
- मोठा आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या विक्रीस मनाई
- साखळी फटाक्यांच्या आवाजावर १०५ ते ११५ डिसेबलपर्यंतची मर्यादा
- ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत मनाई
- जे फटाके विविध रंग निर्माण करतात, आवाज करत नाहीत, असे फटाके रात्री दहा वाजल्यानंतर फोडण्यास मुभा