शनिवारवाड्याजवळ अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शनिवारवाड्याजवळ अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
शनिवारवाड्याजवळ अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

शनिवारवाड्याजवळ अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : शिवाजी रस्त्यावर शनिवारवाडा परिसरात विरुद्ध दिशेने जात असलेली दुचाकी आणि टेंपो यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंगळवारी (ता. ११) सकाळी हा अपघात झाला. संदीप शिक्काप्रसाद वरुण (वय २२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. अपघातात सहप्रवासी विशाल कनिकराम वरुण (वय ३०, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) जखमी झाले आहेत. याबाबत बाळासाहेब सावंत (वय ३६, रा. गणेश पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार संदीप आणि सहप्रवासी विशाल भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने शिवाजी रस्त्याने निघाले होते. शनिवारवाड्याजवळ पहाटे साडेतीनच्या सुमारास भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी समोरून येणाऱ्या टेंपोवर आदळली. सहायक पोलिस निरीक्षक सुशील बोबडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.