जागतिक मानसिक आरोग्य दिन ॉएसएनडीटी विद्यापीठात साजरा साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक मानसिक आरोग्य दिन
ॉएसएनडीटी विद्यापीठात साजरा साजरा
जागतिक मानसिक आरोग्य दिन ॉएसएनडीटी विद्यापीठात साजरा साजरा

जागतिक मानसिक आरोग्य दिन ॉएसएनडीटी विद्यापीठात साजरा साजरा

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) आवारात जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. एसएनडीटी विद्यापीठाचा पदव्युत्तर पदवी मानसशास्त्र विभाग, कला व वाणिज्य महाविद्यालय आणि गृहविज्ञान महाविद्यालयाच्यावतीने संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले.

या कार्यक्रमाची सुरवात महर्षी कर्वे कुटीसमोर जनजागृतीपर पथनाट्य सादर करून झाली. त्यानंतर मानसिक आरोग्याचा संदेश लोकांपर्यंत पोचविण्यासाठी कर्वे रोड परिसरात रॅली काढण्यात आली. यावेळी मानसिक आरोग्यावर आधारित संगीत, गाणी, नृत्य, एकपात्री नाटक, लघु चित्रपट, भित्तिपत्रक आदी विषयांवरील स्पर्धा घेण्यात आल्या. याशिवाय इच्छुक विद्यार्थिनींच्या मानसशास्त्रीय चाचण्या घेण्यात आल्या. चाचण्यांनंतर या विद्यार्थिनींना समुपदेशनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. या कार्यक्रमाला मानसशास्त्र विभागातील प्रा. डॉ. रमेश पठारे, प्रा. संदीप भैसे, गृहविज्ञान महाविद्यालयातील प्रा. ज्ञानेश्वर चाबुकस्वार, प्रा. सविता वाडेकर. कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. जीवन जोशी आणि प्रा. प्राजक्ता भडगावकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्राचार्य सचिन देवरे व प्राचार्य सुभाष पाटील यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

फोटो क्रमांक ः- ००८९६