डेटा अॅनालिसिस प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेटा अॅनालिसिस प्रशिक्षण
डेटा अॅनालिसिस प्रशिक्षण

डेटा अॅनालिसिस प्रशिक्षण

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : विविध कंपन्या व उद्योग आता अधिक तंत्रज्ञान-चालित आणि वेगवान होत असल्याने डेटा अनॅलिस्ट्स कर्मचाऱ्यांच्या शोधात आहेत. २०२२ मध्ये एकूण डेटा पूर्वीपेक्षा ५० पटीने अधिक होण्याचा अंदाज आहे. कंपन्यांना मोठ्या प्रमाणातील डेटाच्या उपलब्धतेसह अद्ययावत राहावे लागेल, जेणेकरून त्या स्पर्धेत मागे राहणार नाहीत. म्हणून, डेटा अनॅलिसिसमध्ये पारंगत असलेले तज्ज्ञ कंपन्यांना गरजेचे आहेत. उपलब्ध डेटा विश्लेषणानुसार व्यवसाय मॉडेलमध्ये सुसंगत बदल घडवणे व स्पर्धेच्या वातावरणात टिकून राहणे महत्त्वपूर्ण आहे. ‘डेटा अॅनालिसिस’ या आघाडीच्या क्षेत्रात करिअर घडविण्यास मदत करणारा अभ्यासक्रम शनिवारपासून (ता. १५) सुरु होत आहे
संपर्क : ७३५०००१६०३.

लोगो- एसआयआयएलसी
पदवीधरांसाठी करिअर फेअर
पुणे, ता. १३ : भारतातील दुसरा सर्वात मोठा उद्योग असणाऱ्या रिअल इस्टेट क्षेत्रात खात्रीशीर प्लेसमेंट साहाय्य देणारे ‘रिअल इस्टेट मार्केटिंग अँड मॅनेजमेंट’ हे सहा महिन्यांचे पदव्युत्तर प्रमाणपत्र ट्रेनिंग सुरु होता आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे हे क्षेत्र मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती करते. या क्षेत्राला कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवण्याचे काम या ट्रेनिंग प्रोग्रॅमद्वारे होणार आहे. ट्रेनिंगदरम्यान विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून थेट प्रात्यक्षिक प्रशिक्षण व पेड इंटर्नशिप दिली जाणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देणाऱ्या ‘करिअर फेअर’चे आयोजन शनिवारी (ता. १५) केले आहे. यामध्ये प्रोग्रॅमची माहिती व रिअल इस्टेट क्षेत्रातील विविध करिअर संधी यांची माहिती तज्ज्ञ देणार आहेत. सर्व क्षेत्रातील पदवीधर यासाठी पात्र आहेत.
माहितीसाठी संपर्क : ८४८४९२६४७५


होममेड चॉकलेट मेकिंग कार्यशाळा
चॉकलेटचे विविध प्रकार बनवण्यास शिकवणारी ऑनलाइन कार्यशाळा शनिवारी (ता. १५) आयोजिली आहे. विविध सण-समारंभांसाठी चॉकलेट तयार करून, आकर्षक पॅकिंग करून विक्री केल्यास नफ्यातील व्यवसाय उभा राहू शकतो. कार्यशाळेत डेअरी मिल्क, किटकॅट, ओरिओ कॅडबरी, मिल्की बार, फाइव्ह स्टार, बाउंटी, डेट्स, पान मसाला, मिंट, फेरेरो रेशो, गुलकंद, रसमलाई, रम रेझीन असे विविध प्रकारचे १३ ते १५ प्रकारचे चॉकलेट व यातील व्यवसाय संधीविषयी माहिती दिली जाईल. प्रतिव्यक्ती शुल्क २,५००रुपये.
संपर्क : ९१४६०३८०३१
ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे