पुणेकरांना रविवारी मोफत जेवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणेकरांना रविवारी मोफत जेवण
पुणेकरांना रविवारी मोफत जेवण

पुणेकरांना रविवारी मोफत जेवण

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः जागतिक अन्नदिनानिमित्ताने रविवारी (ता. १६) मोफत फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. ‘मीलावी’ या पुण्यातील घरगुती जेवणाची डिलिव्हरी करणाऱ्या सेवेतर्फे या महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सबस्क्रायबर्सना १६ लाख रुपये मूल्याचे घरगुती जेवण मोफत पुरवणार आहेत. या जेवणाचे बुकिंग सुरू झाले आहे. या फूड फेस्टिव्हलच्या माध्यमातून पुण्यातील ५० लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे ‘मीलावी’चे लक्ष्य आहे. मीलावी हे एक मोबाईल अॅप्लिकेशन आहे. त्यांच्यातर्फे घरगुती जेवण तुम्हाला घरपोच पुरविण्यात येते. यावर्षी जागतिक अन्नदिनानिमित्ताने ‘कुणीही वंचित राहू नये’ या संदेशाचा प्रसार करण्यात येणार आहे. मीलावी मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा आणि पुण्यातील २५० घरगुती किचनमध्ये उपलब्ध असलेले ‘फ्री मील’ सिलेक्ट करा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी www.mealawe.com या संकेतस्थळाला भेट द्या.