स्वरनाद उपक्रमात गायन, संतूर वादनाचा आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वरनाद उपक्रमात गायन, संतूर वादनाचा आनंद
स्वरनाद उपक्रमात गायन, संतूर वादनाचा आनंद

स्वरनाद उपक्रमात गायन, संतूर वादनाचा आनंद

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : स्वरझंकार म्युझिक अकादमी आणि अनहदनाद फाउंडेशनच्या ‘स्वरनाद'' या उपक्रमातील पहिला कार्यक्रम आज (ता. १४) टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहे. कार्यक्रमात निनाद दैठणकर यांचे संतूर वादन आणि सौरभ कडगावकर यांचे गायन ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. प्रमुख कलाकारांना आशय कुलकर्णी आणि प्रणव गुरव तबल्यावर आणि अमेय बिछु हार्मोनिअमवर साथ करतील. कलाकार आणि संगीतप्रेमी समुदायांनी एकत्र येऊन शास्त्रीय संगीतातील नव्या पिढीच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे. या हेतूने या उपक्रमात पुढील एका वर्षात अशा प्रकारच्या एकूण सहा संगीत मैफली आयोजित करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे आयोजक राजस उपाध्ये आणि सानिका कुलकर्णी यांनी नमूद केले.