महापालिकेमुळे सुरक्षा मंडळाचे नुकसान ः संभूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेमुळे सुरक्षा मंडळाचे नुकसान  ः  संभूस
महापालिकेमुळे सुरक्षा मंडळाचे नुकसान ः संभूस

महापालिकेमुळे सुरक्षा मंडळाचे नुकसान ः संभूस

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः पुणे महापालिकेत सुरक्षा रक्षक नेमायचा असल्याच पुणे जिल्हा सुरक्षा मंडळाच्या नियमाप्रमाणे वेतन देणे व मंडळाला लेव्ही भरणे आवश्‍यक असते. मात्र, महापालिका कायद्यातील पळवाटा शोधून बहुउद्देशीय मनुष्यबळाच्या नावाखाली थेट कंत्राटी सुरक्षा रक्षकांची भरती करत आहे. त्यामुळे खासगी ठेकेदारांचे लाड होत आहेत. कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरू आहे, तसेच सुरक्षा मंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे, असा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते हेमंत संभूस यांनी केला आहे.

महाराष्ट्र राज्य खासगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन आणि कल्याण अधिनियमाप्रमाणे २००३ मध्ये पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापनाही करण्यात आली आहे. पुणे महापालिकेत १५८० कंत्राटी सुरक्षा रक्षक खासगी कंपनीकडून घेतले जातात. त्यामुळे सुरक्षा मंडळाच्या परवानगी, मंडळाच्या नियमानुसार पगार देण्याची व मंडळाला ३ टक्के लेव्ही भरण्याची गरज राहत नाही. महापालिकेत सुरक्षा रक्षकांना कमी वेतनात राबवून घेतले जाते. त्यामुळे अशा प्रकारे शासनाची फसवणूक करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करा, अशी मागणी संभूस यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात खेमनार यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.