‘महिलांना केंद्रस्थानी ठेवून शेतीचा आराखडा बनवावा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महिलांना केंद्रस्थानी ठेवून 
शेतीचा आराखडा बनवावा’
‘महिलांना केंद्रस्थानी ठेवून शेतीचा आराखडा बनवावा’

‘महिलांना केंद्रस्थानी ठेवून शेतीचा आराखडा बनवावा’

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः ऊसतोड कामगार असो वा शेतात काम करणाऱ्या महिला असो. आजही त्या आपल्या हक्कापासून दूर आहेत. राज्यांत सुमारे १४ लाख ऊसतोड कामगार आहेत. यापैकी ८० टक्के या महिला आहेत. शेतामध्ये काम करणाऱ्यांमध्येही पुरुषांपेक्षा जास्त संख्या महिलांची आहे. तेव्हा सरकारने शेतीचा आराखडा बनविताना महिलांना केंद्रस्थानी ठेवावे, अशी मागणी मकामच्या (महिला किसान अधिकार मंच) वतीने पत्रकार परिषेदत करण्यात आली. तसेच विविध ठरावाचीही माहिती शुभदा देशमुख यांनी दिली.

‘मकाम’च्या वतीने एस. एम. जोशी सभागृह येथे १२ व १३ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याला १५ जिल्ह्यातील सुमारे २०० हून अधिक महिला उपस्थित होत्या. परिषदेत सात सत्र पार पडले. या वेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचे प्रश्न, ऊसतोड कामगार महिलांचे प्रश्न या बाबत चर्चा झाली. या वेळी विविध ठराव झाले. यात ग्रामीण आदिवासी महिलांनादेखील शेतकरी म्हणून ओळख मिळावी, यासाठी ग्रामपंचायत पातळीवर नोंदणी करता यावी, तसेच त्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे, महिला शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षेततची हमी देण्यात यावी. यात मोफत आरोग्य सेवा, पाणी पुरवठा, मुलांचे शिक्षण व मातृत्व योजना आदींचा समावेश करण्यात यावा. सामूहिक शेतीसाठी महिलांच्या गटांना प्रोत्साहन द्यावे त्यांना कर्ज, शेतीच्या योजना व बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी, शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विविध जिल्ह्यांत समिती स्थापन करण्यात यावी आदी विविध मागणीचे ठराव करण्यात आले. या वेळी मनीषा तोटले, सुवर्णा दामले, माधुरी खडसे आदी उपस्थित होते.