दृष्टी उपक्रमांतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दृष्टी उपक्रमांतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण
दृष्टी उपक्रमांतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण

दृष्टी उपक्रमांतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : भाजपच्या एज्युकेशन सेलतर्फे दृष्टी उपक्रमांतर्गत महापालिकेच्या शाळांमधील १५० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच ९० महापालिका, खासगी शाळांमधील ११० शिक्षक आणि ७० मुख्याध्यापकांना ‘नीव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रशांत हरसुले आदी उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान मूलभूत साक्षरता, संगणक वर्ग घेण्यात आला. तसेच शिक्षकांचे मानसिक, भावनिक आरोग्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासारखे विविध स्तरावरील प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन भाजप शिक्षण सेलच्या अध्यक्षा सीमा तंवर यांनी केले. ऊर्मी साळवे यांनी सूत्रसंचालन केले.