पुण्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
पुण्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

पुण्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः शहरात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा शुक्रवारीही (ता. १४) कायम आहे. मागील दोन दिवसांपासून शहरात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाने राज्याला चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत यलो अलर्ट कायम आहे.

शहरातील बहुतेक भागात गुरुवारी सकाळपासूनच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक पावसाची नोंद चिंचवड परिसरात १३ मिलिमीटर एवढी झाली. शुक्रवारीही आकाश अंशतः ढगाळ राहून, दुपारनंतर मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोमोरिन परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर अंदमान समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर, तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रात कोकण, गोव्याच्या किनाऱ्यालगत ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. गेले काही दिवस विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाने दणका दिला आहे.
नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वायव्य भारतातून ३ ऑक्टोबर रोजी परतले. मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा शुक्रवारी (ता. १४) कायम होती. माघारीस पोषक वातावरण होत असल्याने दोन दिवसांत मध्य भारताच्या काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे. तर त्यानंतरच्या पुढील दोन दिवसांत संपूर्ण गुजरातसह महाराष्ट्र, पूर्व भारताच्या काही भागांतून मॉन्सून माघार घेण्याचे संकेत आहेत.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर