शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये मिळणार
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये मिळणार

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये मिळणार

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : राज्य सरकारकडून २०१७ ते २० या तीन वर्षांच्या कालावधीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा बँकेच्या विविध शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालयांच्या सूचनाफलकावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय सरकारने २९ जुलैला घेतला. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांची यादी गुरुवारी सरकारने जाहीर केली. यादीतील शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्जखाते, पासबुक आणि बचत खाते घेऊन नजीकच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आपला आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असेही आवाहन सहकार विभागाने केले. आधार प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यामध्ये थेट प्रोत्साहन लाभाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र ज्या शेतकऱ्यांनी बँक कर्ज खात्यास आधार क्रमांक उपलब्ध केला नाही, अशा शेतकऱ्यांची नावे पूर्तता झाल्यानंतर समाविष्ट करण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये निवडणूक आचारसंहिता लागू आहे अशा गावांतील पात्र शेतकऱ्यांची नावे आचारसंहिता संपल्यानंतर समाविष्ट केली जाणार आहे, असेही सहकार विभागाकडून सांगण्यात आले.