शेतकरी महिलांची राज्यव्यापी परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी महिलांची
राज्यव्यापी परिषद
शेतकरी महिलांची राज्यव्यापी परिषद

शेतकरी महिलांची राज्यव्यापी परिषद

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः राष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगाने महिला किसान अधिकारी मंचाच्यावतीने (मकाम) शेतकरी महिलांची राज्यव्यापी परिषद आयोजित करण्यात आली होती. या दोन दिवसीय परिषदेमध्ये राज्याच्या विविध भागांमधून महिला शेतकरी सहभागी झाल्या. या परिषदेत विविध सत्रांमध्ये विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांचे प्रश्‍न, ऊसतोड कामगार महिलांच्या समस्या, वन अधिकाराशी संबंधित महिलांची कामे तसेच, नावीन्यपूर्ण प्रयोगांचा समावेश होता.
या परिषदेत छाया दातार, संध्या नरे पवार, सुभाष वारे, डॉ. भाग्यश्री टिळेकर, सुशीला मोराळे, जया पाईकराव, मंगल खिंवसरा आदींनी सहभाग घेतला होता. या परिषदे दरम्यान विविध ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये महिला शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षिततेची हमी देणे, सामूहिक शेतीसाठी महिलांच्या गटांना प्रोत्साहन करणे, आत्महत्याग्रस्त महिला शेतकऱ्यासंदर्भात शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी, लवकरात लवकर ओळखपत्र मिळणे, महिला ऊसतोड कामगारांचीही स्वतंत्र नोंदणी व्हावी, ऊसतोडीच्या ठिकाणी हेल्पलाइन सुविधा अशा विविध ठरावांचा यात समावेश आहे.