पुणे : आता प्रतीक्षा ओबीसी आरक्षणाची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation
पुणे : आता प्रतीक्षा ओबीसी आरक्षणाची

पुणे : आता प्रतीक्षा ओबीसी आरक्षणाची

पुणे - प्रभागरचना आणि महिला आरक्षणाची सोडत पूर्ण झाल्यानंतर आता इच्छुकांचे ओबीसी (इतर मागासवर्गीय) आरक्षणाकडे लक्ष लागून राहिले आहे. ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला, तर पुन्हा लॉटरी पद्धतीने ते आरक्षण टाकण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांच्या मनातील धाकधूक कायम असल्याचे चित्र सध्या राजकीय वर्तुळात पाहावयास मिळत आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. ३१) महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यामुळे निवडणुकीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनुसूचित जाती-जमाती आणि महिला आरक्षणांबाबतची उत्सुकता आता संपली आहे. ओबीसी आरक्षणाचा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे आता या आरक्षणाची उत्सुकता इच्छुकांमध्ये लागून राहिली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत १२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी ओबीसी आरक्षणासाठी नेमलेल्या बाठिया आयोगाचा अहवाल सादर होत आहे. त्याच मध्य प्रदेश सरकारला ओबीसीचे आरक्षण टिकविण्यात यश आले आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात देखील ओबीसींना आरक्षण मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

असे आहे गणित...

  • राज्य सरकारने कायद्यात केलेल्या बदलामुळे पुणे महापालिकेची सदस्य संख्या १७३ वर

  • सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या बाजूने निकाला दिला, तर ४७ जागा ओबीसीसाठी राखीव

  • या जागा निश्‍चित करताना अनुचित जाती आणि जमातीच्या जागा वगळून त्या निश्‍चित कराव्या लागणार

  • या दोन्ही जागा वगळल्या तर १४८ जागा राहतात

  • त्यापैकी ४७ जागा ओबीसीसाठी राखीव ठेवाव्या लागणार

  • त्यामध्ये पन्नास टक्के म्हणजे २३ जागा ओबीसी महिलांसाठी राखीव

  • या जागा निश्‍चित करताना त्या लॉटरी पद्धतीने कराव्या लागणार

  • जुलै महिन्यात न्यायालयाकडून ओबीसी आरक्षणाला ग्रीन सिग्नल दिला तर त्यानंतर एक आठवड्यात ओबीसी आरक्षणाची सोडत काढावी लागणार

  • सध्या सर्वसाधारण महिला आणि पुरुष गटासाठी १४८ जागा दिसत असल्या, तरी त्यापैकी ४७ जागा या ओबीसी आरक्षणासाठी राखीव होणार

  • त्यामुळे इच्छुकांना आणखी धक्का बसण्याची शक्यता

निवडणुका सप्टेंबरमध्येच?

पुणे महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून महापालिकेवर प्रशासकीय राज सुरू झाले आहे. त्यांची मुदत सप्टेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. जुलै महिन्यार ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला, तर त्यानंतर एका आठवड्यात आरक्षणाची सोडत आणि सोडतीनंतर दीड महिन्यात निवडणुका घ्यावा लागतात. हा सर्व कालावधी पाहिला, तर सप्टेंबरमध्ये महापालिकेच्या निवडणुका होऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाळ्यात तशाही निवडणुका घेता येत नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा निकाला काहीही लागला, तरी सप्टेंबरमध्ये निवडणुका घ्याव्याच लागणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f01560 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top