‘पृथ्वी बचाव’ उपक्रमाला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पृथ्वी बचाव’ उपक्रमाला सुरुवात
‘पृथ्वी बचाव’ उपक्रमाला सुरुवात

‘पृथ्वी बचाव’ उपक्रमाला सुरुवात

sakal_logo
By

पुणे, ता. १ : मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागातर्फे पर्यावरण सप्ताहानिमित्त ‘पृथ्वी बचाव’ उपक्रमाला बुधवारपासून सुरुवात झाली. या सप्ताहात पर्यावरण आणि पृथ्वीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत तीन जून रोजी ‘पुणे शहरातील नदी पुनरुत्थान प्रकल्प’ या विषयावर शैलजा देशपांडे यांचे व्याख्यान तर चार जून रोजी निसर्गस्नेही जगणाऱ्या युवकांचे अनुभवकथन होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता शिवाजीनगरमधील इन्स्‍टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्समध्ये होतील. पाच जून रोजी सकाळी १० वाजता होणारी चित्रकला स्पर्धा १२ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी खुली असेल. ही स्पर्धा पिंपरी-चिंचवडमधील सायन्स पार्कमध्ये होईल. सहा जून रोजी पृथ्वीप्रदर्शन व प्रबोधन सायंकाळी ५ वाजता जंगली महाराज उद्यानासमोर होईल. सात जून रोजी सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचा होईल. या वेळी समारोपपत्र वितरणाचा कार्यक्रम स्कोडा ऑटोचे अध्यक्ष संजय खरे यांच्या हस्ते होईल. पृथ्वीचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी प्रत्येकाने कोणती ना कोणती कृती करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन उपक्रमाचे संयोजक राजेंद्रकुमार सराफ यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f01606 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top