कचरा वेचकांच्या उपस्थितीत बाबा आढाव यांचा वाढदिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा वेचकांच्या उपस्थितीत बाबा आढाव यांचा वाढदिवस
कचरा वेचकांच्या उपस्थितीत बाबा आढाव यांचा वाढदिवस

कचरा वेचकांच्या उपस्थितीत बाबा आढाव यांचा वाढदिवस

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः पुणे शहराच्या घनकचरा व्यवस्थापनात भरीव योगदान देणाऱ्या ‘स्वच्छ’ संस्थेच्या कचरा वेचक प्रतिनिधींच्या उपस्थितीत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी आपला ९३ वा वाढदिवस साजरा केला.
या प्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या प्रमुख रंजना गगे, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आशा राऊत, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे, स्वच्छ संस्थेचे संचालक हर्षद बर्डे, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या संस्थापक सदस्य लक्ष्मी नारायण, शीला आढाव आदी उपस्थित होते.

डॉ. आढाव म्हणाले, ‘‘देशातील गोरगरिबांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, आणि त्या कामाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. या भूमिकेने कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत आणि स्वच्छ संस्था करत आहेत. आज स्वच्छ संस्थेमुळे कचरा वेचक पुणे शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहेत. या सर्व माझ्या मुलींचे संसार आज उत्तम सुरू आहेत हे निश्चित सुखावणारे दृश्य आहे. परंतु, त्यांनी निर्माण केलेली ही संस्था यापुढेही उत्तमपणे काम करावी यासाठी महानगरपालिकेनेच निर्माण केलेल्या संस्थेसोबत नियमित करार केला पाहिजे.’’ यावेळी कचरा वेचकांनी बाबांसोबत असलेल्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. वेगवेगळ्या टप्प्यावर, विविध आंदोलने करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचे मूलभूत हक्क मिळवले आणि आम्हाला माणूस म्हणून ओळख मिळाली अशी भावना यावेळी कचरा वेचकांनी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f01711 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top