युको बॅंकेतर्फे ग्राहकांसाठी पीएपीएल योजनेस प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युको बॅंकेतर्फे ग्राहकांसाठी पीएपीएल योजनेस प्रारंभ
युको बॅंकेतर्फे ग्राहकांसाठी पीएपीएल योजनेस प्रारंभ

युको बॅंकेतर्फे ग्राहकांसाठी पीएपीएल योजनेस प्रारंभ

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः कोणतेही उत्पादन बाजारात आणताना नेहमी ग्राहकांच्या गरजांचा विचार युको बॅंकेतर्फे केला जातो. त्याच धर्तीवर ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी पूर्ण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून युको बँकेने आता ‘प्री-अप्रूव्हड पर्सनल लोन्स’ (पीएपीएल) सेवेची सुरवात केली आहे.
या सेवेमध्ये सर्व पात्र ग्राहकांना बॅंकेच्या कोणत्याही शाखेत किंवा कार्यालयात न जाता केवळ पाच मिनिटांत मोबाईलद्वारे कर्ज मंजूर करून त्याचे वितरण केले जाणार आहे. युको ग्राहकांना तातडीच्या निधीची किंवा इतर कारणांसाठी २४ तास सेवेच्या आधारावर त्वरित ‘पीएपीएल’चा लाभ मिळणार आहे. पीएपीएल कर्जासाठी व्याजदर १० टक्के आहे. तसेच यात कोणतेही मुदत पूर्व कर्ज फेडीचे शुल्क (प्री-क्लोजर चार्जेस) नाही. कर्ज पोर्टफोलियोमध्ये १५ टक्के वाढीची नोंद करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहकांना ऑनबोर्ड करण्याच्या उद्देशाने युको बँकेने डिजिटल परिवर्तनास सुरवात केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f01727 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top