
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना पदांचे वाटप चिंचवडमध्ये उद्या उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर होणार
पिंपरी, ता. १ : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली केली आहे. पक्षात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना तूर्तास थोपवले असून कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी पदांचे वाटप केले जाणार आहे. त्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन शुक्रवारी (ता. ३) केले असून त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत.
महापालिका निवडणुकांची तारीख निश्चित नसल्याने पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांना थोडेसे थांबण्यास सांगितल्याचे समजते. ज्यावेळी निवडणुकांची तारीख नक्की झाल्यावरच पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम केला जाऊ शकतो, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात आहे. मात्र, शुक्रवारच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, ‘‘जवळपास ३०-४० जण राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यांना टप्प्या-टप्प्याने पक्षप्रवेश दिला जाईल. यासंदर्भात लवकरच तारीख निश्चित केली जाईल. मात्र, शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दुपारी एक वाजता प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात कार्यक्रम होईल. यावेळी १६० जणांची कार्यकारिणी जाहीर केली जाईल. पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले जातील.’’
महापौर राष्ट्रवादीचाच
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे १०० पेक्षा जादा नगरसेवक निवडून येतील आणि आमचाच महापौर होईल, असा दावा करून गव्हाणे म्हणाले, ‘‘भाजपच्या सत्ता काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. यामधील विविध प्रकरणांची येत्या काळात चौकशी होईल.’’
Web Title: Todays Latest Marathi News Pne22f01776 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..