भिडेवाड्यासाठी भूसंपादनाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिडेवाड्यासाठी भूसंपादनाची मागणी
भिडेवाड्यासाठी भूसंपादनाची मागणी

भिडेवाड्यासाठी भूसंपादनाची मागणी

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः भिडेवाड्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने भूसंपादन करावे, अशी मागणी यांना भिडेवाडा बचाव मोहीम संस्थापक प्रशांत फुले यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे बुधवारी केली. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा १८४८ मध्ये सुरू केली. पण या वाड्याची सध्या दुरवस्था झाली आहे. हा वाडा मोडकळीस आला आहे. या वाड्यासाठी लवकरात लवकर भूसंपादन करण्यात यावे. तसेच त्याबाबतची सर्व माहिती तारीख आणि दस्तावेज क्रमांक आदींचा तपशील जिल्हा प्रशासनाला देण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख दोन दिवस उपलब्ध नसल्याने निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांना समितीने निवेदन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f01784 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top